Jump to content

User:Akarvilhe/sandbox

From Wikipedia, the free encyclopedia

This is an old revision of this page, as edited by Akarvilhe (talk | contribs) at 18:10, 27 July 2021. The present address (URL) is a permanent link to this revision, which may differ significantly from the current revision.

पुरस्कार

  • 'ज्ञाताच्या कुंपणावरून’ ह्या हस्तलिखितास १९८५ साली ग्रंथालीचा विज्ञान पुस्तके/हस्तलिखिते यांसाठीचा द्वितीय पुरस्कार मिळाला.
  • 'वीसशे पन्नास’ ह्या विज्ञान कादंबरीस १९९५ साली विदर्भ साहित्य संघाचा गो.रा. दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार मिळाला.
  • 'कहाणी मानवप्राण्याची’ ह्या मानवशास्त्रविषयक ग्रंथास २०१२ साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार व प्रियदर्शन अकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार मिळाला.
  • त्यांच्या एकूण कादंबरीलेखनासाठी खऱ्यांना २०१४ साली ‘शब्द: द बुक गॅलरी’ ह्या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार मिळाला.
  • 'उद्या’ ह्या त्यांच्या कादंबरीला २०१५ साली लोकमंगल साहित्य पुरस्कार मिळाला.

यापुढे कोणतेही पुरस्कार न घेण्याचा निर्णय सुमारे २०१७ साली त्यांनी घेतल्यामुळे २०२० साली ‘उद्या’ ह्या कादंबरीला जाहीर झालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार मात्र त्यांनी नाकारला. ह्या नकारामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याने त्यांनी स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्द

खऱ्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. मॅट्रिकची परीक्षा १९६१ साली उत्तीर्ण झाल्यानंतर १९६२-६७ ह्या काळात त्यांनी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट अॉफ टेक्नॉलॉजी ह्या संस्थेत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले. तेथून B.Tech. (Honours, Civil) ही पदवी घेतल्यानंतर २००१ सालापर्यंत एका खाजगी कंपनीत ते सिव्हिल इंजीनियर होते. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा आहे.

नंदा (अनंत यशवंत) खरे (१९४६-) हे मराठी भाषेतील एक कादंबरीकार आहेत. त्यांच्या स्वतंत्र (व भाषांतरित) लेखनामध्ये समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना मध्यवर्ती स्थान दिलेले आढळते. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. विवेकवादी आणि विज्ञानाधारित भूमिकेचा सातत्याने पुरस्कार हा गुणविशेष त्यांच्या लेखनात ठळकपणे दिसून येतो.